महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रस्त्यावरील खड्ड्यांच्या निषेधार्थ खासदार-आयुक्तांच्या नावाने वृक्षारोपण

मिरज शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील खड्डयांच्या दुरवस्थेवरून थेट खासदार, महापालिका आयुक्त यांच्या नावाचे झाडे लावत निषेध आंदोलन करण्यात आले आहे.

By

Published : Jun 17, 2021, 7:08 PM IST

रस्त्यावरील खड्ड्यांच्या निषेधार्थ खासदार-आयुक्तांच्या नावाने वृक्षारोपण
रस्त्यावरील खड्ड्यांच्या निषेधार्थ खासदार-आयुक्तांच्या नावाने वृक्षारोपण

सांगली - मिरज शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील खड्डयांच्या दुरवस्थेवरून थेट खासदार, महापालिका आयुक्त यांच्या नावाचे झाडे लावत निषेध आंदोलन करण्यात आले आहे. शहर सुधार समितीने खासदार संजयकाका पाटील आणि महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या कारभाराच्या निषेधार्थ हे आंदोलन केले.

रस्त्यातल्या खड्डयाच्या निषेधार्थ खासदार आणि आयुक्तांच्या नावे वृक्षारोपण करून आंदोलन

खासदार आणि आयुक्तांच्या नावाने वृक्षरोपण

मिरज शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. 5 किलोमीटरच्या या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडली आहेत. तर, पावसामुळे आता रस्त्यातल्या खड्ड्यांमध्ये कायम मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनधारकांना रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे अपघाताची शक्यता आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक सामाजिक संघटनांनी वारंवार मागणी केली आहे. मात्र, लोकप्रतिनिधी व संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत आहेत. सध्या पावसामुळे रस्त्याची मोठी दैना झाली आहे. हा रस्ता आता खड्ड्यांच्या रस्ता झालेला आहे. या रस्त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी सांगलीचे खासदार संजयकाका पाटील आणि सांगली महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या विरोधात आंदोलन केले आहे. शहरातील रस्त्यात असणाऱ्या खड्ड्यात खासदार आणि आयुक्तांच्या नावाने झाडे लावून निषेध करण्यात आला आहे.

'रस्त्यासाठी 27 कोटी मंजूर'

या रस्त्यासाठी (27) कोटी रुपये मंजूर आहेत. पावसाळ्यापूर्वी पॅचवर्क करण्यासाठी राष्ट्रीय प्राधिकरण आणि सांगली महापालिका प्रशासनाला मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी आदेश दिले होते. मात्र, याला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. त्यामुळे मिरज शहर सुधार समितीने खड्ड्यातल्या रस्त्यांवर वृक्षारोपण व बोंबाबोंब करत रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details