सांगली- निवडणूक आयोग मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आतोनात प्रयत्न करत आहे. यासाठी लाखो रुपये जाहिरातीवर खर्च केले जातात. मात्र, एका चहा विक्रेत्याने मतदार मतदान करण्यासाठी प्रवृत्त व्हावे, यासाठी खास ऑफर जाहीर केली आहे. ती ऑफर म्हणजे, 'मतदान केल्याची बोटावरिल शाई दाखवा, चहाच्या बिलात ५० टक्के सूट मिळवा' हरमन चहाच्या दुकान मालकाने ही खास ऑफर जाहीर केली आहे.
मतदान करा; बिलात ५० टक्के सूट मिळावा, सांगलीतील चहा विक्रेत्याचा उपक्रम - tea
'मतदान केल्याची बोटावरिल शाई दाखवा, चहाच्या बिलात ५० टक्के सूट मिळवा' हरमन चहाच्या दुकान मालकाने ही खास ऑफर जाहीर केली आहे.
सांगलीमध्ये हरमन चहा प्रसिद्ध आहे. येथे १० रुपयाला चहा मिळतो. हरमनचा चहा पिण्यासाठी चहा शौकीन मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. लोकसभा निवडणुकीत मतदार मतदान करण्यासाठी प्रवृत्त व्हावे, यासाठी दुकानाच्या मालकाने शक्कल लढवली आहे.
जो मतदार मतदान करून आपल्या बोटाची शाई दाखवेल, त्या मतदारास १० रुपयांचा चहा ५ रुपयात देण्यात येणार असल्याचे मालकाने जाहीर केले आहे. प्रशासनाकडून मतदान करण्यासाठी विविध पातळीवर मतदार जागृती अभियान राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर हरमन चहाचा उपक्रम नक्कीच मतदारांचा उत्साह वाढवणारा आहे.