महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लाच मागितल्यावर चक्क कपडे काढून RTO अधिकाऱ्यांना दिले; पाहा व्हिडिओ - video went viral on social media

Sangli Crime: कडेगाव तालुक्यात एका व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगली आहे. ती म्हणजे आरटीओ कॅम्पमधील, गाडी पासिंगसाठी लाच मागितल्यानंतर सामाजिक कार्यकर्तेनी चक्क आपली कपडेच काढून अधिकाऱ्याला देत आंदोलन केल्याचा प्रकार घडला आहे. कपडे काढून सामजिक कार्यकर्ता संबंधित कर्मचाऱ्यांच्या मागे लागल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल video viral social media होत आहे.

Sangli Crime
Sangli Crime

By

Published : Oct 15, 2022, 5:49 PM IST

सांगली कडेगाव तालुक्यात एका व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगली आहे. ती म्हणजे आरटीओ कॅम्पमधील, गाडी पासिंगसाठी लाच मागितल्यानंतर सामाजिक कार्यकर्तेनी चक्क आपली कपडेच काढून अधिकाऱ्याला देत आंदोलन केल्याचा प्रकार घडला आहे. कपडे काढून सामजिक कार्यकर्ता संबंधित कर्मचाऱ्यांच्या मागे लागल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल video viral social media होत आहे.

लाच मागितल्यावर चक्क कपडे काढून RTO अधिकाऱ्यांना दिले

पासिंगसाठी लाच मागणीचा प्रकार कडेगाव मधील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मांडवे यांनी आपला ट्रॅक्टर पासिंग करण्यासाठी कडेगावमध्ये आरटीओ विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या कॉम्पमध्ये आले होते. यावेळी त्यांना गाडी पासिंगसाठी लाच मागणीचा प्रकार करण्यात आला. video viral social media मात्र मांडवी यांनी आपली सर्व कागदपत्रे पूर्ण असताना लाच कशासाठी द्यायची हा प्रश्न उपस्थित केला. मात्र संबंधित कर्मचाऱ्यांनी पासिंगसाठी नकार दिल्यानंतर संतापलेल्या मांडवी यांनी आपल्याकडे पैसे नाहीत.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलत्यामुळे आपल्या अंगावरची कपडे घ्या आणि गाडी पासिंग करून द्या,असा पवित्रा घेतला आणि आरटीओ कार्यालयाच्या बाहेर थेट कपडे अंगावरचे कपडे काढून लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याच्या मागे लागले.अधिकारी पुढे आणि मांडवे हे आपले अंगावरचे कपडे काढून मागे होते. आरटीओ कार्यालयाच्या परिसरामध्ये हा सर्व प्रकार सुरू होता आणि या घटनेचा सर्व व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details