महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shivpremi protest :  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाने हटवला; शिवप्रेमींचे ठिया आंदोलन सुरू - Shivpremi protest

आष्टा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा ( Chhatrapati Shivaji Maharaj ) बसवण्यात आलेल्या पुतळ्याचा वाद आता पेटणार आहे. शिवप्रेमींच्याकडून रातोरात गनिमी काव्याने बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj statue) अखेर हटवण्यात आला आहे. परिसरातील संपूर्ण वीज पुरवठा खंडित करून प्रशासनाने प्रंचड पोलीस बंदोबस्तात रात्रीच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला ( Statue of Chhatrapati Shivaji Maharaj removed ) आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj statue
अखेर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाने हटवला

By

Published : Jan 4, 2023, 9:00 AM IST

अखेर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाने हटवला

सांगली : आष्टा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा ( Chhatrapati Shivaji Maharaj ) पुतळा बसवण्यात या भूमिकेतून मंगळवारी पहाटेच्या सुमारास शिवप्रेमींनी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 फुटी अश्वारूढ पुतळयाची प्रतिष्ठापणा करण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने पुतळा परिसरात प्रंचड पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. (Chhatrapati Shivaji Maharaj statue) तर पुतळ्याला परवानगी आणि जिल्हा प्रशासनाने पुतळयासाठी आष्टा नगरपालिकेकडे जागा हस्तांतरण करण्यासाठी शिवप्रेमी आक्रमक झाले होते. यासाठी मंगळवारी सायंकाळी 7 वाजता पुतळ्याच्या समोर महाआरती करण्याचे जाहीर करण्यात आले होते. तर या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पुतळयाच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात आले होते. ( Statue of Chhatrapati Shivaji Maharaj removed )

शिवप्रेमींनी ठिया आंदोलन सुरू केले :भाजपा नेते नाशिकांत पाटील ( BJP leader Nashikant Patil ) यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमींनी ठिया आंदोलन सुरू केले, त्यानंतर प्रशासनाकडून पुतळ्याला परवानगी आणि जागा हस्तांतरण करण्याचे जाहीर करण्यात आल्याची माहिती निशिकांत पाटील यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. तर जागा हस्तांतरण केल्याशिवाय पुतळा हलवू नये, अशी भूमिका शिवप्रेमींनी जाहीर केली होती. दरम्यान प्रशासनाकडून पुतळा हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आष्टा शहरातील सांगली इस्लामपूर रस्त्यावर भाजपा नेते निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमींनी रास्ता रोका केला. यावेळी पोलिस आणि शिवप्रेमींमध्ये झटापटीचा प्रकार घडला, त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले होते.

पुतळा हटवल्याचे पडसाद उमटण्याची शक्यता : यानंतर प्रशासनाने पुतळा परिसरातील वीज पुरवठा खंडित करून मंगळवारी रात्रीच्या सुमारास पुतळा हटवण्याचे काम सुरू केले आणि प्रचंड पोलीस बंदोबस्तात मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अखेर हटवण्यात आला. दरम्यान पोलीस प्रशासनाच्या दडपशाही आणि पुतळा हटवल्याचा निषेधार्थ समस्त शिवप्रेमींनी आज बुधवारी आष्टासह वाळवा तालुका बंदची हाक दिली आहे. त्यामुळे उद्या पुतळा हटवल्याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आष्टा शहरात प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात (Police deployment ) करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details