सांगली - महापालिकेकडून महापालिका क्षेत्रातील अतिक्रमणांच्या विरोधात मोहीम सुरू करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसात मनपाने धडक कारवाई करत शहरातील सुमारे 150हून अधिक ठिकाणचे अतिक्रमण हटवण्यात आले आहेत.
सांगली महापालिका शहरातील प्रमुख मार्गावर व्यापारी, व्यावसायिकांनी आपल्या दुकांनाच्या बाहेर शेड, बोर्ड त्याचप्रमाणे पत्रे मारून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे प्रमुख मार्गावरील रस्ते मोठे आहेत. मात्र, या अतिक्रमणामुळे वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत होते. याचबरोबर अनेक फुटपाथवरसुद्धा अतिक्रमणे करण्यात आली असल्याने नागरिकांना चालणेही मुश्किल झाले होते. याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी मुख्य मार्गावरील आणि फुटपाथवरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.