सांगली- अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अरुण कोळी असे आरोपीचे नाव असून सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. पीडित मुलीवर कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार करण्यात आला होता.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
सांगलीतील मिरजमध्ये 28 नोव्हेंबर 2016 रोजी इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर आरोपीने बलात्कार केला होता. पीडित मुलीवर कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार करण्यात आला होता. याप्रकरणात आरोपी अरुण कोळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सांगलीच्या मिरजमध्ये 28 नोव्हेंबर 2016 रोजी इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर आरोपीने बलात्कार केल्याची घटना घडली होती. पीडित मुलीला तिच्या कुटुंबास जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी अरुण कोळी याने जबरदस्तीने गाडीवर बसवून मिरजेनजीकच्या ढवळी येथे एका शेतात नेऊन बलात्कार केला होता. यानंतर दोन दिवसांनी बलात्काराचा प्रकार उघडकीस आला होता.
याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबाने आरोपी अरुण कोळी याच्याविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आज खटल्याची अंतिम सुनावणी पार पडली. ज्यात सरकारपक्षातर्फे 6 साक्षीदारांकडून साक्ष नोंदवण्यात आल्या. यामध्ये आरोपी अरुण कोळीला दोषी ठरवत जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून अरविंद देशमुख यांनी काम पाहिले.