अकरा वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार, नराधमास वीस वर्ष सक्तमजुरीची शिक्षा.. - sangli district court news
पीडित मुलाने घरी आल्यावर सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये जफार उर्फ जमाल नदाफ याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा खटला सांगली न्यायालयमध्ये सुरू होता. गुरुवारी या खटल्याची अंतीम सुनावणी पार पडली. ज्यामध्ये पीडित मुलगा आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्ष ग्राह्य मानून न्यायालयाने जमीर उर्फ जमाल नदाफ याला 20 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सांगली -एका अल्पवयीन अकरा वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्या प्रकरणी एका तरुणास 20 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जाफर उर्फ जमाल नदाफ असे या नराधमाचे नाव आहे. सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने ही सुनावली ठोठावली आहे. सांगली शहरामध्ये 2019 मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला होता.
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार -सांगली शहरा मध्ये एका अकरा वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. एका 19 वर्षीय तरुणाकडून हा घृणास्पद प्रकार करण्यात आला होता. 29 डिसेंबर 2019 रोजी अल्पवयीन मुलगा हा सायकलवरून प्रोजेक्टची बॅटरी आणण्यासाठी चांदणी चौककडे निघाला होता. यावेळी रस्त्यामध्ये थांबलेल्या जाफर उर्फ जमाल नदाफ याने अल्पवयीन मुलास थांबवत, आपला मोबाईल शाळेच्या आवारात पडल्याचं सांगितले व मोबाईल शोधण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. त्यानंतर सुट्टीमुळे निर्जन असलेल्या कर्मवीर भाऊराव विद्यामंदिर,शाळा क्रमांक 43 च्या आवारात अल्पवयीन मुलगा आणि नराधम जमाल पोहोचले. त्यानंतर जमाल याने अल्पवयीन मुलाला शौचालयामध्ये नेऊन जीवे मारण्याची धमकी देत, त्याला अंगावरचे कपडे काढायला सांगत अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.
20 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा -या घटनेची पीडित मुलाने घरी आल्यावर सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये जफार उर्फ जमाल नदाफ याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा खटला सांगली न्यायालयमध्ये सुरू होता. गुरुवारी या खटल्याची अंतीम सुनावणी पार पडली. ज्यामध्ये पीडित मुलगा आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्ष ग्राह्य मानून न्यायालयाने जमीर उर्फ जमाल नदाफ याला 20 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. त्याच बरोबर दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.या खटल्या मध्ये सरकारी वकील म्हणून रियाज मुजावर यांनी काम पाहिले.