सांगली -आई, पत्नी आणि दोन मुलींचा खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भारत इरकर असे या आरोपीचे नाव असून जत तालुक्यातल्या कुडनूरमध्ये ही घटना घडली होती. आर्थिक अडचणीच्या नैराश्यातून इरकर याने हे कृत्य केले होते.
हेही वाचा -पोलिस शिपाई विनायक शिंदेकडे ठाणे आणि नवी मुंबईची वसूली, गोपनीय डायरी आली समोर
आई, पत्नी आणि मुलींचा केला होता खून
जत तालुक्यातल्या कुडनूर या ठिकाणी 10 ऑक्टोबर 2016 रोजी 4 जणांची हत्या झाल्याची घटना घडली होती. आरोपी भारत इरकर (वय 49) याचा आणि त्याची सावत्रआई जनाबाई इरकर यांच्यात शेतजमिनच्या वाटणीचा वाद सुरू होता. हा वाद न्यायालयात सुरू असताना भारत इरकर याच्या बाजूने निकाल लागला होता. मात्र, सावत्रआई जनाबई यांनी याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती, ज्यातून सुनावणी होऊन जनाबाई यांच्या बाजूने निकाल लागला होता. दरम्यान, उच्च न्यायालयातील दाव्यामुळे भारत इरकर याला मोठ्या आर्थिक खर्चाला सामोरे जावे लागले होते.