सांगली - पुणे-बंगळुरु मार्गावर चालकाला डुलकी लागल्याने ट्रक अनियंत्रित होउन अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स आणि टेम्पोच्या धडकेत टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुणे-बंगळुरु महामार्गावर खासगी बस व टेम्पोचा अपघात, एक जण जागीच ठार - sangali news
पुणे-बंगळुरु मार्गावर चालकाला डुलकी लागल्याने ट्रक अनियंत्रित होउन अपघात झाला आहे. यामध्ये टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे.
पुणे-बंगळुरु मार्गावरील येलूर फाटा वैभव ट्रॅव्हलिंग कंपनीची ट्रॅव्हल्स थांबली होती. यावेळी पाठीमागून आलेल्या टेम्पोने गाडीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोराची होती की टेम्पोच्या पुढील भागाचा चक्काचूर होऊन ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला तर बदली ड्रायव्हर असलेला राजेंद्र चव्हाणच्या हाताला व पायाला मुक्का मार लागला आहे. इंद्रजीत रामा गायकवाड (वय 21) रा.सोमनाथपूर ता. उदगिरी जि. लातूर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. इंद्रजित याला आठवड्यापूर्वीच ट्रान्सपोर्टचे लायसन्स मिळाले होते. त्याच्या पश्चात आई-वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे.