महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू - पुणे बंगळुरू महामार्ग

पुणे बंगळुरू महामार्गावर भीषण अपघातात ( Accident On Pune Bengaluru Highway ) एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कासेगाव येथे हा भीषण अपघातात झाला आहे. येवलेवाडी फाट्यावर थांबलेल्या कंटेनर जाऊन चारचाकी गाडी आदळून हा भीषण अपघात घडला आहे. मृत कुटुंबीय हे कोल्हापूरच्या जयसिंगपूर येथील आहेत.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Jun 4, 2022, 9:22 PM IST

सांगली- पुणे बंगळुरू महामार्गावर भीषण अपघातात ( Accident On Pune Bengaluru Highway ) एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कासेगाव येथे हा भीषण अपघातात झाला आहे. येवलेवाडी फाट्यावर थांबलेल्या कंटेनर जाऊन चारचाकी गाडी आदळून हा भीषण अपघात घडला आहे. मृत कुटुंबीय हे कोल्हापूरच्या जयसिंगपूर येथील आहेत.

पिंपरी-चिंचवड येथून जयसिंगपूरकडे निघालेल्या एका कुटुंबियाच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. वाळवा तालुक्यातील पुणे बंगळुरू महामार्गावरील कासेगाव येथील येवलेवाडी फाटा या ठिकाणी हा भीषण अपघात घडला आहे. अरिंजय आण्णासो शिरोटे (वय 35 वर्षे), स्मिता अभिनंदन शिरोटे ( वय 38 वर्षे), सुनेशा अभिनंदन शिरोटे (वय 9 वर्षे), पुर्वा शिरोटे ( वय 14 वर्षे) आणि विरेन अभिनंदन शिरोटे ( वय 4 वर्षे), अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. सर्व जण कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील रहिवासी आहेत. शिरोटे कुटुंबीय पिंपरी-चिंचवड येथून जयसिंगपूर या आपल्या गावी निघाले होते. कासेगाव नजीक आले असता येवलेवाडी फाटा येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका कंटेनरवर शिरोटे कुटुंबियांची भरधाव चारचाकी गाडी जाऊन आदळली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की शिरोटे कुटुंबियांच्या चारचाकी गाडीचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळी कासेगाव पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला आहे. या अपघाताची नोंद कासेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.

हेही वाचा -डोंबिवली ते ठाकुर्ली दरम्यान धावत्या लोकलमधून पडून दोन प्रवाशांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details