सांगली- जत तालुक्यातील गोंधळेवाडी येथे जमिनीच्या वादातून झालेल्या मरहाणीत एक तरुण शेतकरी जखमी झाला होता. ही घटना मंगळवारी (३१ मार्च) घडली होती. या तरुणाचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुशांत खंडू गळवे (वय १९) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेलेल्या माहितीनुसार, गोंधळेवाडीतील गळवे वस्ती येथील खंडू गळवे यांचा घरासमोरील रस्त्यासंबंधी जमिनीचा वाद आहे. मंगळवारी रात्री त्यांचा मुलगा सुशांत घरासमोर बसला असताना ५ संशयितांनी त्याला काठीने मारहाण केली. या वेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेले खंडू लक्ष्मण गळवे यांनाही मारहाण करण्यात आली. मारहाणीत खंडू लक्ष्मण गळवे यांचा मुलगा सुशांत गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.