महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली : महिला कर्मचाऱ्यानेच मारला 'अॅमेझॉन'च्या 28 लाखांवर डल्ला, गुन्हा दाखल - अॅमेझॉन शॉपिंग

कंपनीच्या नोव्हेंबर 2020 ते एप्रिल 2021मधील लेखा परीक्षण अहवालात ही बाब समोर आली. त्यानंतर ट्रान्सपोर्ट कंपनीचे केतन वाघ यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात संशयित भाग्यश्री पावले या महिलेविरोधात कंपनीच्या 28 लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

By

Published : Oct 22, 2021, 7:28 PM IST

सांगली -अमेझॉन कंपनीची तब्बल 28 लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सांगलीमधील अॅमेझॉन कंपनीच्या महिला कर्मचाऱ्याकडून ही फसवणूक झाली आहे. याप्रकरणी भाग्यश्री पावले या संशयित महिलेविरोधात संजयनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

संजय क्षीरसागर

हेही वाचा -अ‌ॅमेझॉनवर विक्रेत्यांना मराठीतही करता येणार व्यवसायाची नोंदणी

लेखा परीक्षण अहवालात उघड

सांगलीच्या बालाजीनगर येथे अमेझॉन कंपनीचे ट्रान्सपोर्ट कार्यालय आहे. येथून ऑनलाइन खरेदी केलेल्या वस्तू घरपोच करणाऱ्या एका महिला कर्मचाऱयाने कंपनीची 28 लाख रुपयांची रक्कम हडप केल्याचा प्रकार घडला आहे. ग्राहकांच्या घरी वस्तू पोहोच केल्यानंतर पैसे घेतले जातात. जर सुट्टे पैसे नसतील, तर ग्राहकाच्या खात्यावर कंपनीकडून पैसे वर्ग केले जातात. याचा फायदा उचलत संशयित भाग्यश्री पावले या महिलेने 111 ग्राहकांच्या खात्यावर अधिकचे पैसे जमा करून ते रोखीने परत घेतले. कंपनीच्या नोव्हेंबर 2020 ते एप्रिल 2021मधील लेखा परीक्षण अहवालात ही बाब समोर आली. त्यानंतर ट्रान्सपोर्ट कंपनीचे केतन वाघ यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात संशयित भाग्यश्री पावले या महिलेविरोधात कंपनीच्या 28 लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा -अ‌‌ॅमेझॉनकडून डिजीटल देयक व्यवहारात २२५ कोटींची गुंतवणूक

अशी सुरू होती अॅमेझॉनची फसवणूक

संशयित भाग्यश्री पावले अॅमेझॉन कंपनीच्या इंटेक्स ट्रान्सपोर्टमध्ये कर्मचारी आहेत. या महिलेकडे अॅमेझॉन कंपनीचे परतावा करणारे अॅप आहे. एखाद्या ग्राहकाकडे जर वस्तू पोहोच करण्यासाठी गेले असता ग्राहकाला परत सुट्टे पैसे देण्यासाठी पैसे नसतील, तर कंपनीच्या अॅपवरून ग्राहकाचे उरलेले परत करण्यात येतात. या महिलेने याचा फायदा उचलत अमेझॉन ऑनलाइनवरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अधिक रकमेचा परतावा करत ग्राहकाकडून परतावा करण्यात आलेली रक्कम परत घेत जवळपास 28 लाखांवर डल्ला मारला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details