सांगली- मिरजेत एका तृतीय पंथीयाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चाकूने भोसकून तृतीय पंथीयाचा खून करण्यात आला आहे. गौस रज्जाक शेख उर्फ काजल असे मृत तृतीय पंथीयाचे नाव आहे. या हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
चाकूने भोसकून मिरजेत तृतीय पंथीयाचा खून - Gauz Razzak Shaikh alias Kajal murder case
मिरजेतील एसटी स्टँड परिसरात असणाऱ्या एका कॉम्प्लेक्समध्ये गौस रज्जाक शेख (३५) यांचा खून झाला. घटनेनंतर जखमी अवस्थेत आढळलेल्या शेख यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.
मिरजेतील एसटी स्टँड परिसरातील असणाऱ्या एका कॉम्प्लेक्समध्ये गौस रज्जाक शेख (३५) यांचा खून झाला. घटनेनंतर जखमी अवस्थेत आढळलेल्या शेख यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे. गौसची हत्या कोणी केली आणि कोणत्या कारणातून केली ते अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी मिरज शहर पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.
हेही वाचा-जयंत पाटलांचं भाषण ऐकायला माणसंसुद्धा थांबत नाहीत - मुख्यमंत्री