सांगली: शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी टिकली लावली नाही, म्हणून एका महिला पत्रकाराला मुलाखत न देता घडली होती. घटनेनंतर सांगलीत पोहचल्यावर एक निवेदन देताना महिला अधिकाऱ्यासोबत मोठ्या आदराने वागल्याचा प्रकार समोर आला आहे. टीकली नसलेल्या एका महिलेला एक वागणूक आणि टिकली नसलेल्या तत्कालीन अप्पर अधीक्षक महिला अधिकार्याला दिलेल्या वागणुकीबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
Photo Viral: संभाजी भिडेंचा कुंकू लावण्याचा नारा कुठं गेला? सोशल मीडियावर फोटो व्हायरल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Photo Viral: टीकली नसलेल्या एका महिलेला एक वागणूक आणि टिकली नसलेल्या तत्कालीन अप्पर अधीक्षक महिला अधिकार्याला दिलेल्या वागणुकीबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू
पोलीस अधीक्षिका मनीषा डुबुले यांना निवेदन: मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांची भेट घेतल्यानंतर महिला पत्रकाराला टिकली नाही, म्हणून भिडे गुरुजींनी मुलाखत दिली नव्हती. ही घटना झाल्यानंतर सांगलीत पोहोचल्यानंतर टिपू सुलतान जयंती साजरी करू न देण्याबाबत तत्कालीन सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षिका मनीषा डुबुले यांना निवेदन दिलं होतं.
टिकली लावली नव्हती: विशेष म्हणजे यावेळी मनीषा डूबुले यांनी टिकली लावली नव्हती, तर भिडे गुरुजींनी महिला अधिकाऱ्याला निवेदन देणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर विना टिकलीच्या महिला अधिकार्याला सोबत आदराची वागणूक, या दुजाभावा बद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.