महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वादळी वाऱ्याच्या तडाख्यात तान्हुल्याचा मृत्यू - Sangli hailstorm

मतकुणकी येथे सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामध्ये गावातील शेतकरी विश्वनाथ शिरतोडे यांच्या घराचे पत्रे उडून गेले. तेथे बांधण्यात आलेल्या पाळणाही वाऱ्यासोबत उडून गेला. त्यावेळ पाळण्यात असणाऱ्या एका ६ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Child Death
बाळाचा मृत्यू

By

Published : May 19, 2020, 3:39 PM IST

सांगली - वादळी वाऱ्यामुळे घराचे पत्रे उडून गेल्याने एका सहा महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सांगलीच्या मतकुणकी येथे हा प्रकार घडला. यासोबतच गारपीट आणि अवकाळी पावसाचा मोठा तडाखा द्राक्ष बागांना बसला आहे.

सांगली जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. मतकुणकी येथे सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामध्ये गावातील शेतकरी विश्वनाथ शिरतोडे यांच्या राहत्या घराचे पत्रे उडून गेले. तेथे बांधण्यात आलेला पाळणाही वाऱ्यासोबत उडून गेला. त्यावेळ पाळण्यात असणाऱ्या एका ६ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान, गारपीट आणि अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे. द्राक्ष बागांना फुटणाऱ्या नवीन पालवीला गारांमुळेमार बसला आहे. वारंवार येणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details