सांगली -कृष्णा नदीच्या पात्रातील मगरीच्या हल्ल्यात एक वृद्ध गंभीर जखमी झाला आहे. नूरमहंमद मुल्ला असे या वृद्धाचे नाव आहे. पलूस येथील आमणापूरमध्ये ही घटना घडली.
मगरीच्या हल्ल्यात वृद्ध जखमी, कृष्णेच्या पात्रात घडली घटना - सांगली मगरीच्या हल्ल्यात वृद्ध जखमी
आमणापूरमध्ये कृष्णा नदीच्या पात्रातील मगरीच्या हल्ल्यात एक वृद्ध गंभीर जखमी झाला आहे. नूरमहंमद मुल्ला असे या वृद्धाचे नाव आहे.
![मगरीच्या हल्ल्यात वृद्ध जखमी, कृष्णेच्या पात्रात घडली घटना](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4842472-thumbnail-3x2-croco.jpg)
जखमी नूरमहंमद मुल्ला
मगरीच्या हल्ल्यात वृद्ध जखमी
हेही वाचा - कोल्हापुरात आढळला मोठा बॉम्बसाठा; शहरात खळबळ
नूरमहंमद मुल्ला हे सकाळी आंघोळीसाठी कृष्णा नदी पात्रात गेले होते. यावेळी अचानक एका मगरीने त्यांच्यावर हल्ला चढवला. मगरीने मुल्ला यांच्या पायाला धरून पाण्यात ओढून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुल्ला यांनी जोरदार प्रतिकार करत मगरीच्या तावडीतून सुटका करून घेतली. मुल्ला यांच्या उजव्या पायाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर पलूसमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.