महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...आणि बाप्पा झाले 'त्या' मुस्लीम कुटुंबाच्या घरात विराजमान - ganesh utsav muslim family

मी माझ्या घरी गणपती बसवल्याचे मंडळाला कळवले व त्यानुसार घरात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली. आता मी, माझी पत्नी व कुटुंब दररोज गणपती बाप्पाची आराधना करतो, असे रमजान मुलाणी यांनी सांगितले.

गणेश उत्सव ढवळी
पुजा करताना कार्यकर्ते

By

Published : Aug 24, 2020, 10:32 PM IST

सांगली- मिरजेच्या ढवळी येथे जाती-पातीचे बंधन तोडून एका मुस्लीम कुटुंबाने आपल्या घरात गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. कोरोनामुळे यंदा गणेश मंडळांनी रस्त्यावर मंडप टाकून गणपती न बसवण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. या पार्श्वभूमीवर ढवळी गवातील गणेश नगर येथील एकता मंडळाला गणपती कोठे बसवायचा हा प्रश्न पडला होता. मात्र, मंडळाचे कार्यकर्ते रमजान मुलाणी यांनी स्वत:च्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करून पेच सोडवला व जिल्ह्यातील नागरिकांसमोर एक आदर्श निर्माण केला.

माहिती देताना रमजान मुलाणी

यावर, प्रशासनाने केलेल्या आवाहनामुळे गणपती कोठे बसवायचा, हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातही मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होणार होते. तसेच, प्रथेनुसार एका घरात दोन गणपतींची प्रतिष्ठापना होत नाही. त्यामुळे, कार्यकर्त्यांच्या घरी गणपती बसवणे शक्य नव्हते. त्यामुळे, मी माझ्या घरी गणपती बसवणार असे मंडळाला कळवले व त्यानुसार घराता गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली. आता मी, माझी पत्नी व कुटुंब दररोज गणपती बाप्पाची आराधना करतो, असे रमजान मुलाणी यांनी सांगितले.

गणपती बाप्पाला कुठे बसवायचे हा प्रश्न होता. त्यासाठी अनेक बैठका झाल्या. आम्हाला चिंता सतावत होती. अशात मुलाणी यांनी पुढाकार घेत आपल्या घरी बाप्पाला बसविण्याचा निर्णय घेतला. याचा आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही त्यांच्या प्रस्तावाला त्वरित होकार देत त्यांच्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना केली, असे एकता गणेश मंडळाचे अध्यक्ष अभिनंदन पाटील यांनी सांगितले. तसेच, आमच्या गणेश मंडळाचे नाव एकता आहे. त्यामुळे, आम्ही सर्व एकत्र गुण्यागोविंदाने राहातो. केवळ, नावातच एकता नसून प्रत्यक्षात आमच्यात एकता असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

काही समाजकंटकांमुळे नेहमीच २ धर्मात जातीय तेढ निर्माण करणारे प्रसंग घडतात. मात्र, अशा समाजकंटकांना रमजान मुलाणी आणि एकता गणेश उत्सव मंडळाने चपराक दिली आहे. शिवाय, त्यांची कृती समाजासमोर एक आदर्श असून समाजात अशाच पद्धतीने एकता राहिली पाहिजे हा संदेश त्यातून व्यक्त होत आहे.

हेही वाचा-ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जयराम कुष्ठे यांचे निधन; सांगलीत घेतला अखेरचा श्वास

ABOUT THE AUTHOR

...view details