सांगली - मुलाकडून मारहान व त्रास देण्याचा प्रकार असह्य झाल्याने एका आईने कृष्णा नदीच्या पूलावरून उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार त्या ठिकाणी उपस्थित नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी याबद्दल तात्काळ पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पूलावरून उडी मारण्याच्या तयारीत असणाऱ्या त्या दु:खी मातेचे प्राण वाचवत तिला ताब्यात घेतले आहे.
मुलाच्या त्रासामुळे आईचा पूलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, प्रसंगावधान राखत पोलिसांनी घेतले ताब्यात.. - attempt suicide
मुलाच्या त्रासामुळे आत्महत्येचा प्रयत्न करणार एका आईला सांगली पोलिसांनी प्रसंगावधान राखत वाचवले आहे. कृष्णा नदीच्या आयर्विन पुलावरून उडी मारण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी सदर महिलेला ताब्यात घेतले आहे.
शहरातील एका महिलेला तिच्या मुलाकडून मारहाण करून त्यांच्याकडील असणारे दागिने काढून घेण्यात आल्याचा प्रकार घडला. त्यानंतर सदर महिलेने शहरातल्या कृष्णा नदीवरील पुलावर जाऊन नदीपात्रात उडी मारण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांनी याबाबतची माहिती शहर पोलिसांना देताच तातडीने घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत, सदर महिलेची समजूत काढून तिला ताब्यात घेतले आहे.
या घटनेमुळे पुलावर मोठ्या प्रमाणात बघ्यांची एकच गर्दी झाली होती. तर एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे याठिकाणी सर्व घडामोडी सुरू होत्या. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे महिलेचे प्राण वाचले आहेत.