महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली बोट दुर्घटना : कृष्णेच्या महापुरात आजीच्या कुशीतच झाला चिमुकल्याचा करूण अंत - sangli

बोट उलटल्यानंतर या आजीने आपल्या चिमुकल्या नातवाला महापुरातून वाचवण्यासाठी छातीशी घट्ट कवटाळले. तिने अखेरपर्यंत नातवाचा हात सोडला नाही. अखेर या चिमुकल्याचा आजीसोबतच तिच्या कुशीत मृत्यू झाला.

कृष्णा नदीच्य महापुरातही तिने सोडला नाही चिमुकल्याचा हात

By

Published : Aug 8, 2019, 4:09 PM IST

Updated : Aug 8, 2019, 7:54 PM IST



सांगली - पलूस तालुक्यातल्या ब्रम्हनाळ येथे कृष्णा नदीच्या पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढताना एक बोट उलटली. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला. यातील काही मृतदेहांची छायाचित्रे ईटीव्ही भारतच्या हाती आली आहेत. यातील एक छायाचित्र मन पिळवटून टाकणारे आणि डोळ्यात पाणी आणणारे आहे.

एक आजी महापुरात बोट उलटल्यानंतर आपल्या चिमुकल्या नातवाला वाचवण्याचा अखेरपर्यंत प्रयत्न करत होती. मात्र ती या चिमुकल्याला वाचऊ शकली नाही आणि या दोघांचाही या महापुरात करूण अंत झाला.

बोट उलटल्यानंतर या आजीने आपल्या चिमुकल्या नातवाला महापुरातून वाचवण्यासाठी छातीशी घट्ट कवटाळले. तिने अखेरपर्यंत नातवाचा हात सोडला नाही. अखेर या चिमुकल्याचा आजीसोबतच तिच्या कुशीत मृत्यू झाला. हे छायाचित्र हृदयाला पार पिळवटून टाकणारे आणि सुन्न करणारे आहे.

संबंधित खासगी बोट कृष्णा नदीच्या पुरात अडकलेल्या साधारपणे २५ जणांना घेऊन ब्रम्हणाळमधून नजीकच असलेल्या खटावकडे निघाली असतानाच उलटली. या घटनेतील मृतांमध्ये ७ महिला, १ पुरुष आणि एका २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश असल्याचे समजते. तर एकूण १५ जणांना या घटनेतून वाचवण्यात यश आले आहे.

Last Updated : Aug 8, 2019, 7:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details