महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'माती विना शेती'; टेरेसवर फुलवली पाण्यावर शेती - Rabindra Sawant vegetable farming

ऑगस्ट महिन्यात सावंत यांनी आपल्या पत्नीच्या सहायाने अपार्टमेंटच्या टेरिसवर ४०० स्क्वेअर फुटच्या जागेत पाण्याचे पाईपलाईन, कोकोपीटचे रॅक आणि शेडनेटचे आच्छादन उभारले. त्यातून 'माती विना शेतीचा' बगिचा फुलवला. बगिच्यात टोमॅटो, चेरी, कोथिंबीर, काकडी, पालक ही उत्पादने कोकोपीटच्या माध्यमातून तर पाण्यावर परदेशी भाज्या उगवल्या.

sangli
टेरिस शेतीचे दृश्य

By

Published : Dec 15, 2019, 12:46 PM IST

सांगली- 'माती विना शेती' होऊ शकते, असे सांगितले तर कदाचित तुम्हाला पटणार नाही. मात्र, सांगलीतल्या एका दांपत्याने टेरेसवर हा प्रयोग यशस्वी केला आहे. पाणी कोकोपीटच्या सहाय्याने सावंत दांपत्याने परदेशी व इतर भाजीपाल्यांचे उत्पादन केले आहे. त्यांचा हा प्रयोग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी व नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

'माती विना शेती', टेरिसवर फुलली पाण्यावर शेती

शेती करायची म्हणजे जमीन, चांगली माती आणि मुबलक पाणी या गोष्टींची आवश्यकता असते. मात्र, जमीन, मातीशिवाय भाजीपाल्याचे उत्तम पद्धतीने उत्पादन केले जाऊ शकते, असे म्हटल्यावर आपल्याला यावर विश्वास बसणार नाही. पण, सांगलीतील रवींद्र सावंत यांनी ही किमया साध्य करून दाखवली आहे. ते पण घरच्या घरी. रवींद्र सावंत यांनी अपार्टमेंटमध्ये असलेल्या आपल्या फ्लॅटच्या टेरेसवर भाजीपाल्यांचे उत्तम उत्पादन केले आहे. यात प्रामुख्याने परदेशी भाजीपाल्यांचा मोठा समावेश आहे. विशेष म्हणजे, परदेशी भाजीपाला हा फक्त पाण्यावर पिकवला आहे. तर, इतर भाजीपाला हा कोकोपीटच्या माध्यमातून पिकवला आहेत.

सावंत यांचे शिक्षण बीएससी.अॅग्री झालेला आहे. आणि ते सध्या एका बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर काम करत आहेत. नोकरीच्या निमित्ताने सावंत यांना बाहेरच्या देशात जाण्याची अनेक वेळा संधी मिळाली. विदेशात सावंत यांनी पाण्यावर केली जाणारी शेती पाहाली आणि त्यातूनच सावंत यांना आपल्या फ्लॅटच्या टेरिसवर स्वतःच्या कुटुंबासाठी भाजी पिकवण्याची संकल्पना सुचली.

सहा महिन्यापूर्वी शेतीच्या उभारणीला केली होती सुरुवात

ऑगस्ट महिन्यात सावंत यांनी आपल्या पत्नीच्या सहायाने अपार्टमेंटच्या टेरिसवर ४०० स्क्वेअर फुटच्या जागेत पाण्याचे पाईपलाईन, कोकोपीटचे रॅक आणि शेडनेटचे आच्छादन उभारले. आणि आपल्या टेरिसवर पाणी आणि कोकोपीटच्या माध्यमातून 'माती विना शेतीचा' बगिचा फुलवला. बगिच्यात टोमॅटो, चेरी, कोथिंबीर, काकडी, पालक ही उत्पादने कोकोपीटच्या माध्यमातून तर पाण्यावर परदेशी भाज्या उगवल्या आहेत. रिसायकलिंग द्वारे २०० लिटर पाण्यात या भाजीपाल्यांचे उत्पादन घेण्यात येत आहे. हा संपूर्ण परदेशी भाजीपाला प्रमुख्याने सलाद म्हणून तसेच पिझ्झा आणि बर्गरमध्ये वापरला जातो. विशेष म्हणजे, सावंत कुटुंब टेरेसवर पिकवलेला भाजीपाला स्वत: ही वापरतात आणि अपार्टमेंटमधल्या रहिवाशांना देखील मोफत देतात. रवींद्र सावंत यांनी आपल्या टेरिसवर केलेला 'माती विना शेतीचा' हा प्रयोग आज सर्वसामान्य नागरिकांबरोबर शेतकऱ्यांनाही दिशादर्शक ठरत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details