वाळवा (सांगली) - तालुक्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील केदारवाडी जवळ एक वर्षाच्या मादी बिबट्याचा सोमवारी (दि. 26 जुलै) रात्री अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला.
सांगली : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू - सांगली बातमी
वाळवा तालुक्यातील केदारवाडी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मादी बिबट्याचा मृत्यू झाला.
याबाबत प्राणी मित्र संतोष औंधकर, सरपंच अमर थोरात यांनी वनविभागास याबाबत माहिती दिली. त्यानंतर वनक्षेत्रपाल सुशांत काळे, वनरक्षक दीपाली सागावकर यांसह कासेगाव पोलीस ठाण्याचे संतोष देसाई,अभिजित कारंजकर, शिवाजी यादव वनविभागाच्या यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली.
यबाबत अधिक माहिती अशी, हा बिबट्या काळमवाडीच्या दिशेने शेतातून कासेगावकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर आला. रात्री बिबट्या महामार्गावर गेल्यानंतर कोल्हापूरहून वाळव्याच्या दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाची धडक त्याला बसली. यात त्याच्या पोटाला, तोंडाला मार लागून कानातून रक्त आले. यातच त्याचा मृत्यू झाला. मृत बिबट्याच्या पार्थीव शिराळा येथे शवविच्छेदनासाठी शिराळा येथे नेण्यात आले.