सांगली -अपहरण ( Abduction ) झालेल्या एक दिवसाच्या बाळाची, अपहरणकर्त्या महिला नर्सचा ( Kidnapped female nurse ) अवघ्या सहा तासात सांगली पोलिसांनी छडा लावला आहे. त्यांनतर चिमुकला आपल्या आईच्या कुशीत सुखरूप सुखावला. तर, अपहरणकर्ती महिला नर्स गजाआड ( nurse kidnapped the baby ) झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एक दिवसाच्या बाळाचे अपहरण करणारी महिला नर्स दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयात नोकरीला लागली होती. मात्र, हे अपहरण नेमकं कोणत्या कारणातून केलं ? हे अद्याप स्पष्ट झालेलं नसून अधिक तपास तासगाव पोलीस करत आहेत.
एका दिवसाच्या बाळाचे अपहण - तासगाव शहरातल्या सिद्धेश्वर चौक या ठिकाणी असणाऱ्या डॉक्टर अंजली पाटील यांच्या रुग्णालयामध्ये तालुक्यातल्या चिंचणी येथील एक महिला शनिवारी प्रसूती झाली होती. एक गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी सकाळी या बाळाचे अपहरण ( kidnapped baby ) करण्यात आले होते. सुरुवातीला एक नर्स असल्याचं भासवून हे अपहरण झाल्याचं समोर आलं होतं. तर चिमुरड्या बाळाला थेट एका बॅगेत घालून महिलेने रुग्णालयातून पलायन केले होतं. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती.
हेही वाचा -Farmer Dies Due to Electric Shock : विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू, दर्यापूर तालुक्यातील घटना