महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना बाबत सोशल मीडियावर अफवा पसरवणे भाजप पदाधिकाऱ्याला पडले महाग, पोलिसांनी ठोकल्या बेड्या - अमित कदम सांगली

इस्लामपूर येथील अमित कदम याने सांगली जिल्हा बांधकाम कामगार या व्हाट्सअ‌ॅप ग्रुपवर एक बड्या नेत्याने कुटुंबाला हजवरून येताना विमानतळावरून सोडवून आणल्याचा संदेश सोशल मिडीयावर व्हायरल केला. यामुळे पसरलेल्या अफवेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरून गैरसमज निर्माण झाला होता. जनतेच्या मनामध्ये भीती निर्माण केल्याने ही कारवाई करण्यात आली.

सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला अटक
सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला अटक

By

Published : Apr 2, 2020, 12:03 PM IST

Updated : Apr 2, 2020, 12:35 PM IST

सांगली - कोरोना रुग्ण असणाऱ्या कुटुंबाला हजवरून येताना विमानतळावरून बड्या नेत्याने सोडवून आणल्याचा संदेश सोशल मीडियावर टाकून व्हायरल करणारा इस्लामपूर येथील भाजप पदाधिकारी व बांधकाम कामगार संघटनेचा नेता अमित बजरंग कदम याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीची शिक्षा ठोठावली असल्याचे इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी सांगितले. तर, याप्रकरणातील मास्टर माईंडलाही रात्री उशिरा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

इस्लामपूर येथील अमित कदम याने सांगली जिल्हा बांधकाम कामगार या व्हाट्सअ‌ॅप ग्रुपवर एक बड्या नेत्याने हजवरून येताना एका कुटुंबाला विमानतळावरून सोडवून आणल्याचा संदेश सोशल मिडीयावर व्हायरल केला. यामुळे पसरलेल्या अफवेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरून गैरसमज निर्माण झाला होता. जनतेच्या मनामध्ये भीती निर्माण केल्याने ही कारवाई करण्यात आली.

15 फेब्रुवारीपासून चीन, इटली, दक्षिण कोरिया, जर्मनी, फ्रान्स, स्पेन, या सात देशांतून तर 18 मार्चनंतर कतर, ओमान, कुवेत, अमेरिका येथून भारतात येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईनचे शिक्के मारले जात होते. यामध्ये सौदी अरेबिया देशाचा समावेश नाही. त्यामुळे इस्लामपूर शहरातील बाधित कुटुंबियांना क्वारंटाईनचे शिक्के मुंबई विमानतळावर मारले गेले नाही. मात्र, 19 मार्च रोजी इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांना शिक्के मारण्यात आले. त्यानंतर 20 मार्चला त्यांना सांगली येथे दाखल करण्यात आले. त्यामुळे त्या कुटुंबीयांना बड्या नेत्याने विमानतळावरून वरदहस्ताने इस्लामपूरला आणल्याची ही फक्त अफवा असल्याचे स्पष्ट होत आहे.

याप्रकरणी पोलीस कॉस्टेबल संजय पवार यांनी फिर्याद दिली. रात्री उशिरा पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी अमित बजरंग कदम याला अटक केली असून त्याच्याविरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक साहिल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी सपोनी गणेश प्रसाद भरते अधिक तपास करत आहेत.

Last Updated : Apr 2, 2020, 12:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details