सांगली- जोधा- अकबर चित्रपटावरून ( Jodha Akbar Movie ) सांगलीत २००८ साली दंगल भडकली ( Sangli Riot Case 2008 ) होती. याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे आणि माजी आमदार नितीन शिंदे यांच्यासह संशयित ९० आरोपी सांगली न्यायालयात हजर झाले ( Sambhaji Bhide In Court For 2008 Riot Case ) आहेत. याप्रकरणी एकूण ९४ जणांवर गुन्हा दाखल आहे.
संभाजी भिडे पहिल्यांदाच हजर
गुन्हा दाखल झाल्यानंतर आज पहिल्यांदा संभाजी भिडे सांगली न्यायालयात ( Sangli District Court ) हजर झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सांगली न्यायालयाबाहेर अधिकचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सांगली न्यायालयाबाहेर अधिकचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काय आहे घटना ?
जोधा- अकबर या चित्रपटाच्या प्रदर्शनास विरोध करण्यात आला होता. यावेळी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी अटकाव केल्यानंतर सांगलीत तोडफोड आणि जाळपोळ झाली होती. त्यावेळी सांगलीत संचारबंदी पण लागू करण्यात आली होती. एसटी बसेस आणि सार्वजनिक मालमत्तेच नुकसान सुद्धा यामध्ये झालं होतं. तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्णा प्रकाश ( IPS Krishna Prakash ) यांच्या कारकिर्दीत ही दंगल घडली होती.