महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बेड देता का बेड? म्हणत कोरोनाबाधित वृद्धेने रस्त्यावरच सोडले प्राण - सांगली कोरोनाबाधित महिला मृत्यू

बेड उपलब्ध होऊ न शकल्याने एका वृद्ध कोरोनाबाधित महिलेचा रस्त्यावरच गाडीत मृत्यू झाला. 8 तास आपल्या आजीला अ‌ॅडमिट करण्यासाठी वणवण फिरूनही बेड न मिळाल्यानेच आपल्या आजीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातवाने केला आहे.

deadbody
मृतदेह

By

Published : Sep 9, 2020, 1:38 PM IST

सांगली - उपचाराविना सांगलीमध्ये कोरोना रुग्णांना रस्त्यावरच जीव सोडण्याची वेळ आली आहे. बेड उपलब्ध होऊ न शकल्याने एका वृद्ध कोरोनाबाधित महिलेचा रस्त्यावरच गाडीत मृत्यू झाला. 8 तास आपल्या आजीला अ‌ॅडमिट करण्यासाठी वणवण फिरूनही बेड न मिळाल्यानेच आपल्या आजीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातवाने केला आहे. नातवाने याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत प्रशासनाच्या अनास्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

कोरोनाबाधित वृद्ध महिलेने रस्त्यावरच सोडले प्राण

मिरज तालुक्यातील बेडग येथे राहणाऱ्या 80 वर्षीय वृद्ध महिलेची तब्येत बिघडल्याने तिच्या नातवाने आपल्या आजीला रात्री 9 वाजता गाडीतून उपचारासाठी सांगलीला नेले. सांगली महानगरपालिकेच्या कोल्हापूर रोडवरील आचार्य आदिसागर कोरोना सेंटरमध्ये महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली, यामध्ये त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर महिलेची ऑक्सिजन लेवल हळूहळू कमी होऊ लागली होती. त्यामुळे कोरोना चाचणी सेंटरमधील वैद्यकीय कर्मचार्‍यांनी तातडीने ऑक्सिजनबेड असणाऱ्या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला नातवाला दिला. तेथून नातवाने आपल्या आजीला घेऊन सांगली आणि मिरज शहरातील कोरोना हॉस्पिटलशिवाय इतर हॉस्पिटलची दारे ठोठावली. सांगलीच्या शासकीय रुग्णालयाकडेही आपल्या आजीला दाखल करून घेण्याची याचना केली मात्र, त्या ठिकाणीही बेड आणि ऑक्सिजन उपलब्ध नाही, अशीच उत्तरे मिळाली. प्रशासनाच्या कॉल सेंटरमध्येही त्याने बेड उपलब्ध असल्याची वारंवार चौकशी केली. नातू रात्रभर आपल्या आजीला गाडीतून घेऊन फिरला मात्र, त्याला रुग्णालयात घेतले नाही. अखेर पहाटे पाचच्या सुमारास त्याच्या आजीने चालत्या गाडीतच आपले प्राण सोडले.

प्रशासनाच्या आरोग्य व्यवस्थेविरोधात उद्विग्न होऊन नातवाने आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाचा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केला. सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा पुरती कोलमडून पडली आहे. बेड आणि ऑक्सिजन वेळेत मिळत नसल्याने अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. मात्र, दुसर्‍या बाजूला प्रशासनाकडून बेड आणि ऑक्सिजन उपलब्ध असल्याचे दावे वारंवार करण्यात येत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details