सांगली -वृद्ध आईचा खून करत स्वतः गळफास घेऊन एका मुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर ( Son Strangled Mother In Sangli ) आला आहे. सांगलीच्या आष्टा येथे ही घटना घडली आहे. आजाराने ग्रस्त असलेल्या मुलाने नैराश्यातून आईचा खून करत आत्महत्या ( Man Suicide In Ashta Sangli ) केली आहे.
शशिकांत रामचंद्र कांबळे ( वय 47 ) असे आत्महत्या करणाऱ्या आणि रतन रामचंद्र कांबळे ( वय 80 ) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. आष्टा येथील दत्त वसाहत मध्ये शशिकांत कांबळे आपल्या कुटुंबासमवेत राहत होते. त्यांचे शहरात कापड दुकान असून, पत्नी, मुलं आणि आई असा त्यांचा परिवार होता. गेल्या काही वर्षांपासून शशिकांत कांबळे हे दम्याच्या आजाराने त्रस्त होते. शशिकांत यांच्या पत्नी व मुले माहेरी गेल्याने घरात झोपलेल्या आईचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत: दुसऱ्या खोलीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केली.