सांगली- सांगली महापालिकेचा अर्थसंकल्प विशेष सभेमध्ये सादर करण्यात आला आहे. 743 कोटी रुपयांचा आणि कोणतीही करवाढ नसलेला अर्थसंकल्प स्थायी समितीचे सभापती आणि महापालिकेचे आयुक्त यांनी ई-बाईकवरून येत सादर केले आहे. विद्यार्थी, मुली आणि आशा सेविका यांच्यासाठी विशेष योजनांचा समावेश करण्यात आला आहे.
कोणतीही करवाढ नसलेले अर्थसंकल्प सादर...
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा 743 कोटी रुपयांचा ( Sangli Municipal Corporation budget ) अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती निरंजन आवटी ( Standing committee chairman Niranjan Awate ) यांनी विशेष महासभेत महापौरांकडे सादर केला. तत्पूर्वी प्रदूषण टाळा आणि इलेक्ट्रॉनिक वाहन वापरा संदेश देण्यासाठी सभापती निरंजन आवटी आणि महापालिका आयुक्त नितीन कापडणीस ( BMC commissioner Nitin Kapadnis ) यांच्यासह अधिकाऱ्यांनी ई-बाईकवरून दाखल होत महासभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात कोणतीही कर वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा-World Whistlers Champion : ओठाची हालचाल न करता कंठातून शिट्टी वाजवणारा अवलिया