सांगली - पाण्यापासून वंचित असणाऱ्या जत तालुक्यातील 64 गावांसाठी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेल्या सिंचन योजनेसाठी पाणी देता येत नसल्याचा खुलासा जलसंपदा विभागाने केला आहे. यानंतर, संतप्त दुष्काळग्रस्तांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक राज्यात जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही या गावातील नागरीकांनी केली आहे. गुड्डापूर येथील तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शेतकरी मेळाव्यात गावांनी हा निर्णय घेतला आहे.
सांगली जिल्ह्यातला दुष्काळी तालुका म्हणून जतची ओळख आहे. तालुक्याचा पूर्वभाग अद्यापही पाण्यापासून वंचित आहे. ही 64 गावे आजही पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. तालुक्यातील म्हैसाळ सिंचन योजनेत या गावांचा समावेश करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान विद्यमान खासदार संजय पाटील यांनी 64 गावांच्या पाण्यासाठी विस्तारित म्हैसाळ सिंचन योजना प्रस्तावित केली होती. या योजनेला खुद्द मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जतमध्ये येऊन तत्वतः मंजुरी देण्यात आल्याची घोषणा केली होती. त्यामुळे जत तालुक्याच्या माथ्याचा दुष्काळीपाणी मिटेल अशी अपेक्षा बळावली होती.
हेही वाचा -महापूर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची केंद्रासह महाराष्ट्र व कर्नाटक शासनाला नोटीस