महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत एकाच दिवसात ६ नव्या रुग्णांची भर, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २३ च्या घरात - सांगली कोरोना रुग्णसंख्या

बुधवारी जिल्ह्यात आणखी ६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, ३ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना मिरज कोरोना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन खबरदारी म्हणून 14 दिवसांसाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये रवाना करण्यात आले आहे. यासह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा २३ जाऊन पोहोचला आहे.

सांगलीत एकाच दिवसात ६ नव्या रुग्णांची भर
सांगलीत एकाच दिवसात ६ नव्या रुग्णांची भर

By

Published : May 21, 2020, 8:10 AM IST

सांगली - जिल्ह्यात बुधवारी आणखी ६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दिल्ली, मुंबई आणि अकोला येथून आलेल्या ६ जणांना कोरोना लागण झाली आहे. शिराळा, कडेगाव, आटपाडी तालुक्यासह मिरज शहरातील व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आता २३ वर पोहोचला आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी ही माहिती दिली आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसें-दिवस वाढत आहे. बुधवारी सांगली जिल्ह्यातील सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये शिराळा तालुक्यातील एक, कडेगाव तालुक्यातील दोन, आटपाडीमध्ये दोनजण आणि मिरज शहरातील एकाचा समावेश आहे. शिराळा तालुक्यातील रेड येथे मुंबईहून एक कुटुंब 17 मे रोजी परतले होते. यामध्ये पती, पत्नी आणि दोन मुलांचा समावेश होता. त्यांना प्रशासनाकडून जिल्हापरिषदेच्या शाळेत इन्स्टिट्यूट क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी पती-पत्नीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने मिरजेच्या आयसोलेशन कक्षात दाखल करत स्वॅब टेस्ट घेण्यात आली होती. ज्यामध्ये मंगळवारी महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तर, पतीचा अहवाल हा प्रतीक्षेत होता. तो रिपोर्ट बुधवारी प्राप्त झाला असून पतीलाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

कडेगाव तालुक्यातल्या सोहोली येथील दोघांना कोरोना लागण झाली आहे. मुंबई स्थित असणाऱ्या एका कोरोनाबाधित गरोदर महिलेच्या संपर्कात हे चौघेजण आले होते. १७ मे रोजी ते चौघे सोहोली येथे परतले होते. यापैकी दोघांमध्ये लक्षणे आढळल्याने त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. बुधवारी त्यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. तर, रात्री आणखी तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये आटपाडी तालुक्यातील गोंदिरा येथे मुंबईहुन आलेल्या ६० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. सदर व्यक्ती मुंबई येथून आल्याने प्रशासनाने त्यास कम्युनिटी क्वारंटाईनमध्ये ठेवले होते. मंगळवारी कोरोनाची लक्षणे उद्भवल्याने त्याला मिरज सिव्हिलला पाठविण्यात आले, आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर, आटपाडीच्या खरसुंडी जवळील पिंपरी बुद्रुक येथील एक ३३ वर्षीय व्यक्ती अकोल्याहून गावी पोहोचला होता. त्यालाही कोरोनाची लक्षणे आढळल्याने मिरजेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा रिपोर्टही बुधवारी रात्री पॉझिटिव्ह आला आहे.

सदर कोरोनाबाधित व्यक्तीने अकोल्याहून सातारा व तेथून पिंपरी बुद्रुक असा प्रवास केला आहे. तर, दिल्लीवरून मिरजेत आलेल्या एका महिलेला कोरोना लागण झाली आहे. ही ३० वर्षीय महिला मिरज शासकीय रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या भारत नगरच्या, हडको कॉलनी येथील रहिवासी आहे. या महिलेचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. तर, दुसऱ्या बाजूला जिल्ह्याला दिलासादायक बातमी असून तीन जण बुधवारी कोरोनामुक्त झाले आहेत.

सांगली शहरातील फौजदार गल्ली, मिरजेच्या होळी कट्टा येथे आढळलेल्या दोन कोरोनाबाधित महिला आणि तासगाव तालुक्यातल्या गव्हाण येथील एक व्यक्ती असे तिघेजण बुधवारी कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना मिरज कोरोना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन खबरदारी म्हणून 14 दिवसांसाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये रवाना करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यात एकाच दिवसात ६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, दुसऱ्या बाजूला तीन रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या सध्या २३ झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details