महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली : छापा टाकून अडीच लाखांच्या गुटख्यासह 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगलीमध्ये अवैद्य गुटखाच्या विरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. इस्लामपूर बायपास रस्त्यावर छापा टाकून तब्बल अडीच लाखांच्या अवैद्य गुटख्यासह सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

gutkha worth Rs 2.5 lakh were seized
gutkha worth Rs 2.5 lakh were seized

By

Published : Mar 7, 2021, 9:09 PM IST

Updated : Mar 7, 2021, 9:15 PM IST

सांगली - सांगलीमध्ये अवैद्य गुटखाच्या विरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. इस्लामपूर बायपास रस्त्यावर छापा टाकून तब्बल अडीच लाखांच्या अवैद्य गुटख्यासह सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

छापा टाकून अडीच लाखांच्या गुटख्यासह 6 लाखांचा मुद्देमाल जप्त
छापा टाकून गुटख्याचा साठा जप्त -हे ही वाचा-महिला दिन विशेष : गोंदियात गृहिणींचा 'एक दिन सायकल के नाम' उपक्रम

सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची तस्करी आणि विक्री सुरू आहे. या विरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून कारवाई करण्यात येत आहे. आज शहरातल्या इस्लामपूर बायपास रस्त्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून एका गाडीतून तब्बल अडीच लाखांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. एका गॅरेज समोर ही गाडी लावण्यात आली होती. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून गाडीतील हा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईमध्ये मालवाहतूक गाडीही जप्त करण्यात आलेली आहे. सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे. ए. एस. सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Last Updated : Mar 7, 2021, 9:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details