सांगली - लॉकडाऊनमुळे पंजाबच्या अमृतसर येथे अडकलेले सांगली जिल्ह्यातील गलाई व्यावसायिक आता आपल्या गावी परतत आहेत. अमृतसर येथून विशेष रेल्वेने आज सांगली जिल्ह्यातील गलाई व्यवसायिक मिरज या ठिकाणी पोहोचले आहेत. प्रशासनाकडून सर्वांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना त्यांच्या गावी पाठवण्यात येत होते. सुमारे साडेपाचशेहून अधिक गलाई व्यवसायिक आपल्या कुटुंबासह परतले आहेत. मिरज रेल्वे स्थानकात प्रशासनाकडून या सर्वांचे स्वागत करण्यात आले आहे. त्यानंतर प्रत्येकाची आरोग्य पथकाच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रशासनाकडून यासाठी 24 पथके याठिकाणी नेमण्यात आली होती.
पंजाबहून विशेष रेल्वेने ५५० गलाई व्यावसायिक कुटुंबासाहित सांगली जिल्ह्यात परतले - सांगली लेटेस्ट अपडेट्स
सुमारे साडेपाचशेहून अधिक गलाई व्यवसायिक आपल्या कुटुंबासह परतले आहेत. मिरज रेल्वे स्थानकात प्रशासनाकडून या सर्वांचे स्वागत करण्यात आले आहे. त्यानंतर प्रत्येकाची आरोग्य पथकाच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करण्यात आली.

लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचीच यावेळी आरोग्य तपासणी करण्यात आली, तर वैद्यकीय कर्मचारी, अधिकारी यांच्याकडून यावेळी सुरक्षेच्यादृष्टीने पीपीई कीट यासह विविध खबरदारी घेण्यात येत होती. ज्या व्यक्तींना ताप किंवा संशयास्पद लक्षणे आढळून आली आहेत त्यांना मिरजेच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात येत होते, तर इतर व्यक्तींचे नोंदणी व सर्व माहिती संकलन करून होम क्वारंटाईनचे शिक्के मारत त्यांना गावी पाठवण्याची सोय शासनाकडून करण्यात आली होती.
त्याचबरोबर कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याकडून या सर्व प्रवाशांना पाणी, नाश्ता यासह सॅनिटायझर देण्यात आले. तसेच गावी परतणाऱ्या सर्व प्रवाशांना सक्तीचे होम क्वारंटाईन करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील विविध भागातील विशेषता आटपाडी, खानापूर, विटा या ठिकाणचेही रहिवासी असून ते गलाई व्यवसायाच्या निमित्ताने पंजाब राज्यातील अमृतसरसह आसपासच्या ठिकाणी वास्तव्यास होते.