महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली : शेतातून तब्बल 51 लाख 93 हजारांची गांजाची झाडे जप्त

जत तालुक्यातील सिंदूर येथे एका शेतात लागवड केलेली तब्बल 520 किलो गांजाची झाडे जत पोलिसांनी जप्त केली आहेत. याची किंमती सुमारे 51 लाख 93 हजार 300 रुपये इतकी आहे.

जप्त केलेल्या गांजाच्या झाडांसह आरोपी व पोलीस पथक
जप्त केलेल्या गांजाच्या झाडांसह आरोपी व पोलीस पथक

By

Published : Nov 2, 2020, 10:15 PM IST

जत (सांगली) -जत पोलिसांनी तालुक्यातील सिंदूर या ठिकाणी एका शेतात छापा टाकून गांजा शेती उद्ध्वस्त केली आहे. यावेळी सुमारे 51 लाख 93 हजार 300 रुपये किंमतीची 520 किलो गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई आज (दि. 2 नोव्हेंबर) करण्यात आली आहे.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सिंदूर या ठिकाणी गांजाची शेती करण्यात आल्याची माहिती जत पोलिसांना मिळाली होती. माहितीनुसार पोलिसांनी सिंदूर या ठिकाणी बसप्पा कुसबा अक्कीवाड यांच्या शेतामध्ये छापा टाकला. यावेळी या शेतामध्ये हळदीच्या शेतीआड गांजाची शेती करण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी या शेतातील सर्व गांजाची झाडे उखडून टाकत जप्त केली आहेत. सुमारे 520 किलो हे गांजाची झाडे असून त्यांची किंमत सुमारे 51 लाख 93 हजार 300 रुपये इतकी आहे.

याप्रकरणी बसप्पा कुसबा अक्कीवाड या शेतमालकास पोलिसांनी अटक केली आहे. जत तालुक्यातील पूर्व भागात अनेक ठिकाणी गांजा शेती करण्यात येत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. या महिन्यातील ही दुसरी मोठी कारवाई आहे. गेल्या आठवड्यात सांगली स्थानिक गुन्हे शाखेने उमराणी येथे 17 लाख रुपयांचा गांजा जप्त करत कारवाई केली होती. कालच (1 नोव्हेंबर) पूर्व भागातील जालिहाळ बुद्रुक येथे 70 हजार रुपयांचा गांजा उमदी पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी या विरोधात वेळोवेळी कारवाई केली आहे. मात्र, तरीही जत तालुक्यामध्ये गांजाची शेती करणे हे सुरूच असल्याचे आज जत पोलिसांच्या कारवाईनंतर पुन्हा एकदा समोर आले आहे.

हेही वाचा -विविध मागण्यांसाठी सांगलीतील मंडप डेकोरेटर्स व्यावसायिकांचे धरणे आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details