महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! 5 महिन्याच्या अर्भकाला फेकले नाल्यात... - मृत अर्भक सांगली न्यूज

नवजात अर्भक 4-5 महिन्याचे असून गर्भपात करून नाल्यात फेकून दिल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतचा तपास विश्रामबाग पोलिसांकडून करण्यात येत आहे.

गर्भपात करून मृत अर्भक फेकले नाल्यात !
गर्भपात करून मृत अर्भक फेकले नाल्यात !

By

Published : Apr 27, 2021, 7:11 PM IST

सांगली- एका नवजात अर्भकाचा मृतदेह सांगली शहरातल्या नाल्यामध्ये आढळून आला आहे. धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी नवजात अर्भकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

नाल्यात सापडले मृत अर्भक
सांगली शहरातील चांदणी चौक येथील माळी टॉकीजसमोर असणाऱ्या आप्पा कासार झोपडपट्टीमधील नाल्यात एक अर्भकाचा मृतदेह आढळून आला. सकाळच्या सुमारास नाल्यामध्ये या नवजात अर्भकाचा मृतदेह परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आला. यामुळे एकच खळबळ उडाली. ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भकाचा मृतदेह सांगलीच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. हे नवजात अर्भक 4-5 महिन्याचे असून गर्भपात करून नाल्यात फेकून दिल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या नवजात अर्भकाचा मृतदेह नाल्यात कोणी फेकला? याबाबतीत तपास विश्रामबाग पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच महापालिका आयुक्त नितीन कापडणीस आणि महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनीही घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details