सांगली - सांगली जिल्हा वार्षिक योजनेच्या 320 कोटीच्या आराखड्यास मान्यता मिळाली आहे. पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी 89.17 कोटी रुपयांचा अधिकच्या निधीची तरतूदही यावेळी करण्यात आली आहे.
320 कोटीच्या आराखड्यास मान्यता-
सांगली जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यासाठी 230.83 कोटी रुपये नियतव्ययाची मर्यादा नियोजन विभागाने ठरवून दिली होती.परंतु त्यामध्ये आज झालेल्या बैठकीत 89.17 कोटी रुपयांनी वाढ करून सर्वसाधारण योजनेसाठी सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी 320 कोटी मंजूर करण्यात आले आहेत,अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चालू वर्षाच्या खर्चाचा आढावा घेतल्यानंतर पुढील वर्षाच्या जिल्हा नियोजन प्रारुप आराखड्यास मंजूरी दिली.