सांगली- घरफोड्या करणाऱ्या एका टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत महिलेसह 3 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 13 लाख 56 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
घरफोड्या करणारी सराईत टोळी जेरबंद; 13 लाख 54 हजारांचा मुद्देमाल हस्तगत हेही वाचा - स्वस्तात कांदे मिळाले नाही म्हणून तरुणाने चावा घेऊन तोडलं बोट
शहर आणि उपनगर परिसरात वाढत्या घरफोड्याच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहर आणि ग्रामीण परिसरात घरफोड्या करणाऱ्या एका टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. या कारवाईदरम्यान एकूण 10 गुन्हे उघडकीस आले असून सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 13 लाख 56 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच महिलेसह 3 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे आणि सहायक निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान त्यांनी दिलेल्या माहितीवरून या गुन्ह्यात दोन स्थानिक सराफा व्यापारांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक तपास सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दिली.