महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली : जत जवळ एकाच ठिकाणी दोन भीषण अपघात; 3 जण ठार - दुचाकी अपघात जत सांगली

जत जवळ एकाच ठिकाणी दोन भीषण अपघात घडले आहेत. या अपघातांमध्ये तीन जण ठार झाले आहेत. तीन वाहनांमध्ये हा विचित्र अपघात घडला आहे.

two accident near Jat sangli
भीषण अपघात जत सांगली

By

Published : Dec 20, 2021, 5:41 PM IST

सांगली - जत जवळ एकाच ठिकाणी दोन भीषण अपघात घडले आहेत. या अपघातांमध्ये तीन जण ठार झाले आहेत. तीन वाहनांमध्ये हा विचित्र अपघात घडला आहे.

हेही वाचा -Waste Out of Best : असाही भन्नाट जुगाड...दुचाकी आणि भंगारातुन बनवली चारचाकी टुमदार गाडी

ऊसाच्या ट्रॉलीला दुचाकीची धडक

जत शहरापासून काही अंतरावरील डफळे सहकारी साखर कारखान्यासमोर विजापूर - गुहागर राज्य मार्गावर हा अपघात घडला आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास कारखान्याच्या समोर एक उसाचा ट्रॅक्टर थांबला होता. त्यावर दुचाकीस्वार जोरात धडकला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. रवींद्र उर्फ ओंकार तातोबा माळी ( वय 21 ) असे या तरुणाचे नाव असून, तो जत तालुक्यातील कुंभारी येथील आहे. या अपघातानंतर पोलीस पंचनाम्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली उभी होती.

ट्रॉलीमुळे दुसरा अपघात

याच ठिकाणी रात्री उशिरा उभी असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला भरधाव स्विफ्ट वाहनाची जोरदार धडक बसली, ज्यामध्ये दोन जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झालेत. प्रशांत भोसले आणि त्यांचा 2 वर्षांचा मुलगा मानिकांत भोसले हे दोघेजण जागीच ठार झाले. तर, मृत प्रशांत भोसले यांची पत्नी व अन्य एक जण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. भोसले कुटुंब आपल्या चारचाकी वाहनातून नागजहून उमदी या आपल्या गावी निघाले असता हा अपघात झाला.

हेही वाचा -Kavathemahankal Nagar Panchayat Election : ...तेव्हा तुम्हाला 'आबांची' आठवण येईल, रोहित पाटलांची प्रचार सभेत फटकेबाजी

ABOUT THE AUTHOR

...view details