सांगली : पुतणीची वर्ग मैत्रीण असणाऱ्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत गर्भवती करणाऱ्या (Minor girl rape and made pregnant) एका नराधमास सांगली न्यायालयाने 22 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा (Imprisonment sentence to rapist) सुनावली आहे. रवी भोसले असे या नराधम आरोपीचे नाव आहे. (hard labor for rapist)
12 वर्षांची मुलगी दीड महिन्यांची गर्भवती-मिरज शहरामध्ये फेब्रुवारी 2019 मध्ये एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अचानक पोटात दुखू लागले. त्यानंतर आई-वडिलांनी तिला मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. यावेळी सोनोग्राफी केल्यानंतर ती दीड महिन्यांची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर पालकांनी तिला विश्वासात घेऊन विचारलं असता तिच्या मैत्रिणीच्या काकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले होते. त्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत रवी भोसले (वय 37) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
पीडितेच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी -बारा वर्षाची अल्पवयीन मुलगी ही तिची वर्ग मैत्रीणीला बोलवण्यासाठी घरी गेली असता मैत्रिणीच्या काकाने तिच्यावर तीन ते चार वेळा लैंगिक अत्याचार केला होता. ही बाब कोणालाही न सांगण्याची धमकी देत आरोपीने पीडितेच्या आई-वडिलांना जीवे मारण्याचीही धमकी दिली होती. त्यामुळे पीडित अल्पवयीन मुलीने भीतीने तिच्यावर झालेल्या अन्यायाबाबत कोठेही वाच्यता केली नव्हती. मात्र, तिच्या पोटात दुखू लागल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला होता.
दोषीस 22 वर्षांची सक्तमजूरी-या प्रकरणी महात्मा गांधी चौकी पोलिसांनी रवी भोसले याला अटक करून त्याच्या विरोधात सांगली न्यायालयामध्ये खटला दाखल केला होता. ज्याची अंतिम सुनावणी शनिवारी पार पडली. यामध्ये पीडित अल्पवयीन मुलीसह 11 साक्षीदारांची साक्ष व पुरावे ग्राह्य मानून सांगली न्यायालयाने रवी भोसले याला दोषी ठरवत 22 वर्षांची सक्तमजुरी आणि 10 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यामध्ये सरकारी वकील म्हणून आरती अनंत देशपांडे (साटविलकार) यांनी काम पाहिले.