महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लांडग्यांच्या हल्ल्यात 2 शेतकरी जखमी, बेणापूर येथील घटना - wolf attack

बेनापूर येथील डोंगरावर गावातील दिनकर शिंदे, विठुराय शिंदे हे आपल्या मेंढ्या व म्हशी चारण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक त्याठिकाणी 3 लांडगे पोहचले आणि त्यांनी जनावरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

Farmers injured in wolf attack
लांडग्यांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

By

Published : Oct 23, 2020, 10:33 AM IST

सांगली-लांडग्यांनी केलेल्या हल्ल्यात 2 शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील बेणापूर मध्ये ही घटना घडली. डोंगरावर जनावरे चारण्यासाठी गेले असता 3 लांडग्यांनी हा हल्ला केला आहे. जखमी शेतकऱ्यांवर रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले.

बेनापूर येथील डोंगरावर गावातील दिनकर शिंदे, वय 57 व विठुराय शिंदे, वय 35 हे आपल्या मेंढ्या व म्हशी चारण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक त्याठिकाणी 3 लांडगे पोहचले आणि त्यांनी जनावरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र दिनकर शिंदे व विठुराय शिंदे यांनी लांडग्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र लांडग्यांनी दोघांवर हल्ला चढवला. ज्यामध्ये दिनकर शिंदे यांच्या हाताचे लांडग्यांनी अक्षरशः लचके तोडले तर एका लांडग्याने विठू शिंदे यांच्यावरही हल्ला चढवला.

मात्र विठू शिंदे यांनी जोरदार प्रतिकार केला. पण त्यांच्या हाताला यावेळी लांडग्याने जोरदार चावा घेतला. यानंतर दोघांनी या लांडग्यांच्या तावडीतून सुटका करत गावाकडे धाव घेतली व सर्व हकीकत गावकऱ्यांना सांगितली. यानंतर तातडीने जखमी दिनकर शिंदे व विठू शिंदे यांच्यावर रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details