महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली जिल्ह्यात रविवारी 19 कोरोनाग्रस्तांची भर, एकट्या शिराळा तालुक्यातील १३ जणांचा समावेश - कोरोना सांगली

जिल्ह्यात रविवारी (दि. 28 जून) आणखी 19 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एकट्या शिराळयात तालुक्यात 13 जणांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात 120 अॅक्टीव कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.

gov. hospital
शासकीय रुग्णालय मिरज

By

Published : Jun 29, 2020, 8:14 AM IST

सांगली- जिल्ह्यात रविवारी (दि. 28 जून) आणखी 19 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एकट्या शिराळा तालुक्यात 13 जणांचा समावेश आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 358 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 5 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही 120 झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. जिल्ह्यात रविवारी (दि. 28 जून) रात्रीपर्यंत 19 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 5 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये शिराळा तालुक्यातील 13 जणांचा समावेश आहे. यामध्ये शिराळे खुर्द येथील 9 जण, कोकरूड येथील 2, निगडी येथील 1 आणि ढाणेवाडी येथील 1 जण तर पलूस तालुकयातील दुधोंडी आणि पुनदी येथील 2 जण, तासगाव तालुक्यातील वाघापूर येथील 1,जत तालुक्यातील बिळूर येथील 1,वाळवा तालुक्यातील बावची येथील 1आणि सांगली शहरातील दक्षिण शिवाजी नगर येथील 1, अशा 19 जणांचा समावेश आहे. सर्वांना मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर संबंधित कोरोना बाधित व्यक्तींचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सील करण्यात आला आहे.

तर रविवारी (दि. 28 जून) दिवसभरात पाच जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामध्ये पलूस येथील 2, शिराळा तालुक्यातील पुनवत येथील 1, खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील 1 जण व जत तालुक्यातील निगडी खुर्द येथील 1, असे पाच जणांचा समावेश आहे. या सर्वांना मिरजेच्या कोरोना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन 14 दिवसांसाठी इन्स्टिट्यूट क्वारंटाइनमध्ये पाठवण्यात आले आहे.

दिवसभरात वाढलेले रुग्ण आणि कोरोनामुक्त झालेले रुग्ण, त्यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 120 झाली आहे. तर आतापर्यंत एकूण 358 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून यापैकी 226 जण झाले कोरोना मुक्त झाले आहेत, तर 12 जणांचा मृत्यू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.

हेही वाचा -आमदार पडळकरांना फिरवणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला पडले महागात; पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी

ABOUT THE AUTHOR

...view details