सांगली- जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. दिवसभरात तब्बल १२१ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ८२२ असून एकूण आकडा १ हजार ७६२ पोहोचला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली.
सांगलीत कोरोनाचा हाहाकार, एकाच दिवसात १२१ बाधितांची भर तर ६ जणांचा मृत्यू - सांगली
सांगलीत दिवसभरात तब्बल १२१ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ८२२ असून एकूण आकडा १हजार ७६२ पोहोचला आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहेत. सोमवारी तब्बल १२१ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. बाधितांमध्ये ग्रामीण भागापेक्षा सांगली महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या अधिक आहे. तर मृतांमध्ये मिरज शहरातील २, सांगली शहरातील १, मिरज तालुक्यातील पद्माळे येथील १, बेडग येथील १ आणि जत शहरातील १ रुग्णाचा सामावेश आहे. आत्तापर्यंत ५७ जणांचा मृत्यू झाला आहे.
आत्तापर्यंत उपचार घेऊन ८८३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या कोरोनावर उपचार घेणारे ३५ जण हे अतिदक्षता विभागात असून यामधील १९ जण हे ऑक्सिजनवर तर १४ जण हे नॉन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर तर २ जण इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर आहेत. जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ८२२ झाली आहे. तर आत्तापर्यंत एकूण १,७६२ कोरोना बाधितांची नोंद झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली.