सांगली -जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 1 हजार 660 अपात्र व 12 हजार 607 आयकर भरणाऱ्या अशा एकूण 14 हजार 267 शेतकऱ्यांनी 11 कोटी 81 लाख रूपये लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांनी घेतलेली रक्कम तात्काळ शासनास जमा करावे, असे आदेश दिले आहेत. तसेच तालुकास्तरावर प्रशासनालाही रक्कम वसूल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 14 हजार लाभार्थ्यांनी लाटले 11 कोटी 81 लाख - सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
या योजनेंतर्गत 1 हजार 660 अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर 89 लाख 54 हजार तसेच 12 हजार 607 आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर 10 कोटी 46 लाख 6 हजार रूपये रक्कम जमा झालेली आहे, अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे. तसेच संबंधिताकडून तात्काळ रक्कम वसूल करण्यासाठी तालुकास्तरावर सूचना देण्यात आल्या असून तालुकास्तरावर अपात्र लाभार्थींना नोटीस काढण्याचे काम सुरू असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले आहे.
सांगली जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 4 लाख 58 हजार 190 लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. या लाभार्थ्यांपैकी 1 हजार 660 अपात्र लाभार्थी व 12 हजार 607 आयकर भरणारे अपात्र लाभार्थी यांची यादी शासनाकडून पोर्टलवर प्राप्त झाली आहे. या योजनेंतर्गत 1 हजार 660 अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर 89 लाख 54 हजार तसेच 12 हजार 607 आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर 10 कोटी 46 लाख 6 हजार रूपये रक्कम जमा झालेली आहे, अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे. तसेच संबंधिताकडून तात्काळ रक्कम वसूल करण्यासाठी तालुकास्तरावर सूचना देण्यात आल्या असून तालुकास्तरावर अपात्र लाभार्थींना नोटीस काढण्याचे काम सुरू असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले आहे.
तालुकानिहाय अपात्र लाभार्थ्यांची संख्या..
आटपाडी 14 (68 हजार रूपये), जत 48 (3 लाख 4 हजार रूपये), कडेगाव 159 (7 लाख 10 हजार रूपये), कवठेमहांकाळ 122 (5 लाख 50 हजार रूपये), खानापूर 39 (2 लाख 22 हजार रूपये), मिरज 763 (45 लाख 24 हजार रूपये), पलूस 188 (8 लाख 58 हजार रूपये), शिराळा 22 (1 लाख 12 हजार रूपये), तासगाव 184 (9 लाख 86 हजार रूपये), वाळवा 121 (6 लाख 20 हजार रूपये), अशा एकूण 1 हजार 660 अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर 89 लाख 54 हजार रूपये रक्कम जमा झालेली आहे.
तालुकानिहाय आयकर अपात्र लाभार्थी.
आटपाडी 1548 (1 कोटी 24 लाख 84 हजार रूपये), जत 1206 (97 लाख 88 हजार रूपये), कडेगाव 1603 (1 कोटी 44 लाख 66 हजार रूपये), कवठेमहांकाळ 713 (52 लाख 54 हजार रूपये), खानापूर 1656 (1 कोटी 33 लाख 62 हजार रूपये), मिरज 1644 (1 कोटी 28 लाख 10 हजार रूपये), पलूस 862 (72 लाख 76 हजार रूपये), शिराळा 751 (69 लाख 40 हजार रूपये), तासगाव 1133 (87 लाख 50 हजार रूपये), वाळवा 1491 (1 कोटी 34 लाख 76 हजार रूपये), अशा एकूण 12 हजार 607 आयकर भरणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर 10 कोटी 46 लाख 6 हजार रूपये रक्कम जमा झालेली आहे. अशी एकूण 11 कोटी 81 लाखाच्या आसपास रक्कम प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाटण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.