सांगली - जिल्ह्यामध्ये सोमवारी ११ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये मुंबईहून आलेल्या पलूसमध्ये एकाच घरातील सहा जणांचा तर एका खासगी डॉक्टराचाही समावेश आहे. ६ जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ७२ वर गेली आहे. आतापर्यंत १७८ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ९९ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली.
सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोमवारी यामध्ये आणखी ११ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये मुंबईहुन आलेल्या पलूस मधील एकाच घरातल्या सहा जणांचा समावेश आहे.यात २ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे. तर शिराळा तालुक्यातील मांगले येथील ५३ वर्षीय पुरुष आई ४८ वर्षीय पुरूष अशा २ जणांना कोरोना लागण झाली असून यामध्ये एका खासगी डॉक्टरचा समावेश आहे. मणदूर येथील ७२ वर्षीय वृद्ध महिलेला कोरोना लागण झाली आहे. जतमधील ५० वर्षीय महिला,आणि वाळव्याच्या येल्लूर मधील ६५ वर्षीय वृद्धाला कोरोना लागण झाली आहे. या सर्वांचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त होताच प्रशासनाकडून त्यांना मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सांगलीत आणखी ११ कोरोना रुग्णांची भर, एकाच घरातील ६ जण बाधित - sangli corona latest news
सोमवारी मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार घेत असलेले ६ जण कोरोना मुक्त झालेले आहेत. त्यामध्ये जत तालुक्यातल्या औंढी येथील २७ आणि २९ वर्षीय तरुण, कडेगावच्या नेर्ली येथील २८ वर्षीय तरुण शिराळा तालुक्यातल्या खिरवडे येथील ५२ वर्षीय महिला,तासगाव तालुक्यातील कचरेवाडी येथील २८ वर्षीय युवक आणि मिरज शहरातील येथील ६७ वर्षीय व्यक्ती कोरोना मुक्त झाले आहेत.
सोमवारी मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार घेत असलेले ६ जण कोरोना मुक्त झालेले आहेत. त्यामध्ये जत तालुक्यातल्या औंढी येथील २७ आणि २९ वर्षीय तरुण, कडेगावच्या नेर्ली येथील २८ वर्षीय तरुण शिराळा तालुक्यातल्या खिरवडे येथील ५२ वर्षीय महिला,तासगाव तालुक्यातील कचरेवाडी येथील २८ वर्षीय युवक आणि मिरज शहरातील येथील ६७ वर्षीय व्यक्ती कोरोना मुक्त झाले आहेत. त्यांना मिरजेच्या कोरोना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन १४ दिवसांसाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये रवाना करण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ही ७२ झाली आहे. तर आता पर्यंत जिल्ह्यात १७८ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.आणि यापैकी ९९ जण हे कोरोना मुक्त झाले आहेत. तर ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.