सांगली -ऐतवडे बुद्रुक येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयच्या पटांगणात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी सॅनिटायझर व मास्कचा वापर करत, सोशल डिस्टन्सच्या नियमाचे पालन करण्यात आले. यावेळी गजू भाऊ फ्रेंड्स सर्कलच्यावतीने 108 सूर्यनमस्कार घालण्यात आले.
योग दिनानिमित्त कर्मवीर विद्यालयाच्या पटांगणावर 108 सूर्यनमस्कार.. - जागतिक योग दिन
ऐतवडे बुद्रुक येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयच्या पटांगणात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी सॅनिटायझर व मास्कचा वापर करत, सोशल डिस्टन्सच्या नियमाचे पालन करण्यात आले.

सांगली, वाळवा तालुक्यातील कुरळप पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी गजानन पोतदार हे गेल्या 5 वर्षांपासून मुलींना व मुलांना पोलीस भरतीचे निशुल्क शिक्षण देत आहेत. गेल्या चार महिन्यांपासून त्यांनी सूर्य नमस्कारची सुरूवात केली होती. परंतु, कोरोनामुळे एकत्र येऊ शकत नसल्याने तीन महिन्यापासून विद्यार्थ्यांनी घरामधे सूर्यनमस्कारचा सराव करून आज (रविवार) योग दिनादिवशी 108 सूर्यनमस्कार घालण्यात आले. यासाठी गजानन पोतदार यांनी स्वखर्चाने 20 मुलींना सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप केले.
108 सूर्यनमस्कार घातलेल्या सर्व विद्यार्थिनींना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. कोरोनाच्या महामारीमध्ये कारागिरांना काम नसल्याने त्यांना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पोतदार यांनी विद्यार्थिनींना देण्यात आलेले मेडल हे इस्लामपूर येथील कुंभार यांच्याकडून मातीचे मेडल बनवून घेतले होते. यासाठी त्यांना राजश्री पाटील यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. तर या सूर्यनमस्कार उपक्रमध्ये समर्थ अकॅडमीचे संदीप चौगुले, वैभव चौगुले उपस्थित होते.