सांगली- येथील लोकसभेच्या निवडणुकीत तब्बल १०३ वर्षांच्या आजीबाईने मतदानाचा हक्क बजावला. अंजनाबाई गायकवाड असे या आजीचे नाव आहे. सांगली शहरातील मतदान केंद्रावर त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत मतदान केले आहे.
सांगलीत १०३ वर्षाच्या आजीबाईने बजावला मतदानाचा हक्क - मतदान
सांगलीतील भारत नगर येथे राहणाऱ्या १०३ वर्षाच्या अंजनाबाई रामजी गायकवाड या वृद्ध महिलेने सांगली लोकसभेच्या निवडणूकीत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. गावभाग परिसरातील अजय चौक येथील पालिकेच्या शाळेतील मतदान केंद्रावर त्यांनी सहकुटुंब येऊन मतदान केले.
सांगलीतील भारत नगर येथे राहणाऱ्या १०३ वर्षाच्या अंजनाबाई रामजी गायकवाड या वृद्ध महिलेने सांगली लोकसभेच्या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला. गावभाग परिसरातील अजय चौक येथील पालिका शाळेतील मतदान केंद्रावर त्यांनी सहकुटुंब येऊन मतदान केले.
अंजनबाई या देश स्वतंत्र झाल्यापासून प्रत्येक निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. प्रत्येक निवडणुकीत त्या आवर्जून मतदान करतात. आजही मोठ्या उत्साहाने त्यांनी मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीमध्ये प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, असे आवाहन केले.