सांगली - कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला लक्षात घेऊन १०० वे अखिल भारतीय नाट्यसंमेलन रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी पार पडणारे संमेलन तात्पुरते स्थगित झाले आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी ही याबाबत घोषणा केली.
अखिल भारतीय नाट्य परिषदेचे यंदा शताब्दी वर्ष साजरे होत आहे. यानिमित्ताने 100 वे नाट्य संमेलनाचा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचे आयोजन नाट्य परिषदेकडून करण्यात आले होते. या सोहळ्याचे उद्घाटन सोहळा नाट्यपंढरी सांगलीमध्ये पार पडणार होते. तर दुसरीकडे देशात आणि राज्यात कोरून व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्य सरकार कडून जत्रा,यात्रा आणि गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करण्यात यावेत, अशा सूचना संबंधितांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नाट्य परिषदेने २६ मार्च ते २९ मार्च रोजी सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेले १०० वे नाट्यसंमेलन रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी मुंबईमध्ये ही घोषणा केली आहे. पुढील परिस्थिती पाहून संमेलनाच्या पुढील तारखा जाहीर करण्यात येतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सांगलीमध्ये पार पडणारे संमेलन तूर्त स्थगित झाले आहे.