लग्नाला १० दिवस झालेल्या तरुणाचा धरणात बुडून मृत्यू - अर्जुना धरण
नुकतेच लग्न झालेल्या तरुणाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शशिकांतच्या लग्नाला अवघे 10 दिवस झाले होते. नवदाम्पत्याचा संसार फुलण्याआधीच शशिकांतवर काळाने झडप घातली.
रत्नागिरी - नुकतेच लग्न झालेल्या तरुणाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राजापूर तालुक्यातील पाचल नजिकच्या अर्जुना धरण परिसरात सोमवारी संध्याकाळी हा प्रकार घडला.
शशिकांत लक्ष्मण खेडेकर (वय २६) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. शशिकांतच्या लग्नाला अवघे 10 दिवस झाले होते. शशिकांत सोमवारी संध्याकाळी आपले कुटुंब व मित्रांसोबत अर्जुना धरण परिसरात फिरण्यासाठी गेला होता. त्याचवेळी धरणाच्या पाण्यात आंघोळ करण्याचा मोह त्याला आवरला नाही. पण या मोहानेच त्याचा घात केला. अंघोळ करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो आत बुडू लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. शशिकांतच्या लग्नाला अवघे 10 दिवस झाले होते. नवदाम्पत्याचा संसार फुलण्याआधीच शशिकांतवर काळाने झडप घातली. त्याच्या या दुर्देवी मृत्युमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.