रत्नागिरी - गणेशोत्सवाचे आगमन अवघ्या काही तासांवर आले आहे. त्यामुळे सध्या चाकरमान्यांनी कोकण हाऊसफुल्ल झाले आहे. मात्र, कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत असल्याचे पहायला मिळत आहे.
चाकरमान्यांनी कोकण हाऊसफुल्ल; मात्र रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले हेही वाचा - कोकणातल्या पहिल्या मानाच्या गणपतीचं थाटात आगमन; भाद्रपद प्रतिपदेला प्रतिष्ठापणा
गणेशोत्सवासाठी सध्या लाखो चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. त्यामुळे बस आणि रेल्वेला मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. सध्या रेल्वे स्टेशनवर आलेल्या चाकरमान्यांची गावाकडे जाण्याची लगबग पहायला मिळत आहे. मात्र रेल्वे गाड्या दोन ते तीन तास उशिरा झाल्या आहेत, त्यातच आता गाड्यांना गर्दी झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
हेही वाचा - क्षणभरात प्रेमात पडणारे सौंदर्यमय कोकण; पाहा नयनरम्य फुलांचा देखावा
मुंबई ते मडगाव दरम्यान धावणारी कोकणकन्या एक्सप्रेस (गाडी क्र. १०१११) तब्बल अडिच तास उशिरा धावत आहे. दादर ते सावंतवाडी दरम्यान धावणारी तुतारी एक्स्प्रेस (गाडी क्र. ११००३) एक तास २३ मिनिटे उशिरा, पनवेल-सावंतवाडी तब्बल साडेतीन तास उशिरा, पनवेल-थिविम गणपती विशेष गाडी दोन तास उशिरा, दुरंतो एक्स्प्रेस दोन तास, कुर्ला-सावंतवाडी गणपती विशेष गाडी दोन तास उशिराने धावत आहेत. यामुळे पॅसेंजर गाड्यांपेक्षा जादा पैसे देऊन एक्सप्रेस रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमधून रेल्वे प्रशासनाबाबत नाराजीचा सूर येत आहे.
हेही वाचा - ऐन गणेशोत्सवात कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले