महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कौटुंबिक भांडणातून स्वत:ला पेटवून घेत पत्नीने पतीलाही मारली मिठी

ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली असून या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

suicide news today
suicide news today

By

Published : Mar 24, 2021, 2:58 PM IST

रत्नागिरी -खेड तालुक्यातील कुळवंडी-देऊळवाडी येथे नवरा बायकोचे भांडण विकोपाला जाऊन बायकोने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले, तर त्यावेळी घराबाहेर काही अंतरावर उभ्या असलेल्या पतीलादेखील पेटत्या अवस्थेत मिठी मारली. या घटनेत गंभीररित्या भाजलेल्या महिलेचा मृत्यू झाला असून पतीवर उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली असून या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कुळवडी देऊळवाडी येथे सोमवारी दि २२ रोजी मध्यरात्री ९९ टक्के भाजलेल्या महिलेचा अधिक उपचारासाठी मुंबई येथे नेत असताना वाटेतच मृत्यू झाला तर तिचा पतीदेखील ६० टक्के भाजून गंभीर जखमी झाला आहे. शिल्पा मंगेश निकम (वय ४०) असे मृत झालेल्या महिलेचे नाव असून तिचा नवरा मंगेश बाळाराम निकम हा गंभीररीत्या भाजल्याने त्याला खेडमधील एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे.

खेड पोलिसांकडून तपास

या प्रकारामुळे कुळवंडीसह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. नवरा-बायकोचे भांडण इतक्या विकोपाला का आणि कशासाठी गेले, पत्नीनेच स्वतःला पेटवून घेत आपल्या नवऱ्याला मिठी का मारली, दोघांमध्ये नेमके काय घडले होते, याचा तपास खेड पोलीस करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details