महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

VIDEO : कारच्या धडकेत वृद्ध महिला ठार, रत्नागिरी जिल्ह्यातील घटना - कारची धडक महिला ठार रत्नागिरी

मालगुंड बाजारपेठेतून रस्त्यावरून पायी जाणाऱ्या सरस्वती वाळवे या वृध्देला कारची जोरदार धडक बसली. या धडकेने वाळवे या रस्त्यातच गंभीर जखमी होऊन बेशुध्द पडल्या. त्यांना स्थानिक ग्रामस्थांनी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

women died in car acceident (symbolic)
कारच्या धडकेत महिला ठार (प्रतिकात्मक)

By

Published : Jan 30, 2020, 7:43 AM IST

Updated : Jan 30, 2020, 7:56 AM IST

रत्नागिरी - भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने एक वृद्ध महिला ठार झाली आहे. ही घटना बुधवारी दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास घडली. सरस्वती गणपत वाळवे (वय - ८५, रा. मालगुंड, शिवगणवाडी) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. तालुक्यातील मालगुंड येथील मुख्य बाजारपेठेत ही घटना घडली. अपघातानंतर गंभीर वृध्देला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

VIDEO : कारच्या धडकेत वृद्ध महिला ठार

सांगली जिल्ह्यातील कुपवाडी येथील तुषार मनोहर मुळ्ये (वय - २०), समीर दत्तगीर मकांदार (वय - २९) हे दोन तरुण ओमनी कारमधून (एमएच १० सीएम ०२१८) बुधवारी सकाळी गणपतीपुळेला जात होते. यावेळी मालगुंड बाजारपेठेतून रस्त्यावरून पायी जाणाऱ्या सरस्वती वाळवे या वृध्देला कारची जोरदार धडक बसली. या धडकेने वाळवे या रस्त्यातच गंभीर जखमी होऊन बेशुध्द पडल्या. त्यांना स्थानिक ग्रामस्थांनी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा -पुणा नाईट हायस्कूलचा अभिनव उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांसाठी 'सायकल बँक'

अपघाताची माहिती मिळताच, जयगड पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अपघाताचा पंचनामा करण्यात आला. वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक कृष्णा भोये यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील करत आहेत. तर सीसीटीव्हीत झालेला हा अपघात पाहिल्यानंतर यातील दृश्य पाहून चालक किती बेदरकारपणे गाडी चालवत होता, ते दिसून येत आहे.

Last Updated : Jan 30, 2020, 7:56 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details