रत्नागिरी - वीजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रत्नागिरी जिल्ह्यात घडली आहे. राजापूर तालुक्यातील भू येथे शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. सुनील यशवंत चौगुले (32) असे मृत वायरमनचे नाव आहे.
वीजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू, राजापूर तालुक्यातील भू येथील घटना - Wireman dies of electric shock
वीजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रत्नागिरी जिल्ह्यात घडली आहे. राजापूर तालुक्यातील भू येथे शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.
हेही वाचा -औरंगाबाद तालुक्यात पाच तरुणांचा तलावात बुडून मृत्यू
प्राप्त माहितीनुसार, महावितरण विभागामध्ये कंत्राटी पध्दतीवर वायरमन म्हणून सेवा बजावणारे सुनिल यशवंत चौगुले हे शुकवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भू येथे देखभाल दुरूस्तीचे काम करत होते. काम करत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यानंतर त्यांना तात्काळ राजापूर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेबाबत माहिती मिळताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ राजापूर ग्रामीण रूग्णालयात धाव घेतली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.